Join us

शक्ती कपूरला भीत श्रद्धाच्या मैत्रिणी

By admin | Updated: June 28, 2014 23:57 IST

आपले वडील शक्ती कपूर हे पडद्यावर ज्या प्रकारच्या भूमिका साकारत होते त्या पाहून माङया मैत्रिणी घरी येण्यास भीत असत.

आपले वडील शक्ती कपूर हे पडद्यावर ज्या प्रकारच्या भूमिका साकारत होते त्या पाहून माङया मैत्रिणी घरी येण्यास भीत असत. मैत्रिणीच्या नजरेत माङया वडिलांची प्रतिमा खूप मलिन झाली होती. ख:या जीवनात माङो वडील खूप चांगले आहेत, फक्त चित्रपटात ते तशा भूमिका साकारत असतात, असे मी मैत्रिणींना सांगे; परंतु त्या विश्वास ठेवत नव्हत्या. अखेर मैत्रिणींनी शक्ती कपूर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाल्यानंतर वडिलांबद्दलचे गैरसमज दूर होऊन त्या त्यांच्या फॅनच झाल्या, असे शक्तीची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सांगितले. चित्रपटात वडिल जेव्हा हीरोची धुलाई करत ते बघून आनंद होत होता असेही श्रद्धाने सांगितले.