तब्बल सात वर्षांनंतर प्रेक्षकांना शाहरुख खानचा टॉपलेस लूक पहायला मिळणार आहे. फराह खानच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटात शाहरुख पुन्हा टॉपलेस होणार आहे २००७ मध्ये फराहच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटातील ‘दर्द-ए-डिस्को’ या चित्रपटात शाहरुख टॉपलेस दिसला होता. त्याचा हा लूक हिट झाला होता. ‘हॅप्पी न्यू ईअर’मधील त्याचा हा लूक एखाद्या गाण्याचा भाग असेल की, चित्रपटातील एखादा सिक्सेंस हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळू शकेल. ‘हॅप्पी न्यू ईअर’ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी आणि सोनू सूद यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
पुन्हा टॉपलेस होणार शाहरुख
By admin | Updated: June 20, 2014 11:04 IST