Join us  

शाहिद का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये?

By admin | Published: June 28, 2017 2:59 AM

शाहिद कपूरने आपले घर सोडले असून, तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वत:चे

शाहिद कपूरने आपले घर सोडले असून, तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वत:चे घर असूनही दुसऱ्याच्या घरात शिफ्ट होतात. मात्र, शाहिद घराऐवजी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. बहुतेक जण घरात भांडण झाल्याने किंवा इतर कारणाने घर सोडतात. मात्र, शाहिदच्या घर सोडण्याचे कारण म्हणजे शूटिंगला जाताना आणि येताना होणारा ट्रॅफिकचा त्रास होय. ‘पद्मावती’ या चित्रपटाचे शूटिंग सुरूअसून, या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहदेखील आहेत. हे कलाकारदेखील फिल्मसिटीच्या जवळच राहू लागले आहेत. घरापासून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यात शाहिदला आपला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणून शूटिंग संपेपर्यंत शाहिद याच हॉटेलमध्ये राहणार आहे. शाहिदला शूटिंग ठिकाणी पोहोचायला आणि पुन्हा घरी वापस यायला सुमारे ४ तास वाया जायचे. आता मात्र तो रोज सकाळी लवकर शुटिंग ठिकाणी पोहचतो आणि रात्री उशिरापर्यंत शूट करतो. या चित्रपटात शाहिद दोन लूकमध्ये दिसणार असून त्यासाठी त्याला वर्कआउटदेखील करावे लागते.