Join us

शाहीदचा साखरपुडा

By admin | Updated: March 21, 2015 23:26 IST

शाहीद कपूरचे करिनाबरोबर ब्रेकअप झाल्यावर अनेकींशी नाव जोडले गेले. प्रियंका चोपडाबाबत तो सिरीयसही होता. पण माशी कुठे शिंकली माहीत नाही.

शाहीद कपूरचे करिनाबरोबर ब्रेकअप झाल्यावर अनेकींशी नाव जोडले गेले. प्रियंका चोपडाबाबत तो सिरीयसही होता. पण माशी कुठे शिंकली माहीत नाही. कुठल्याही अभिनेत्रीबरोबर आपण तग धरू शकणार नाही याची बहुतेक शाहीदला जाणीव झाली असावी. त्यामुळेच त्याने दिल्लीच्या मीरा राजपुतबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला. शाहीद आणि मीराचे आध्यात्मिक गुरू एकच असून, त्यांच्यामुळेच हे दोघे एकत्र आले आहेत. लवकरच त्यांचे लग्न होणार आहे.