सं जय गुप्ताच्या आगामी जज्बा या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि इरफान खान या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटातील तिस:या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नुकतेच शबाना आजमींची निवड करण्यात आली आहे. शबाना चित्रपटात एका प्रोफेसरच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट मुंबईत शूट केला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. 2क्15 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवता यावा, अशी संजयची इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.