‘वजनदार’या चित्रपटात आपल्याला सई ताम्हणकर एकदमच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. वजन वाढवलेली, टिपिकल साडी नेसणारी सई या चित्रपटात कावेरीची भूमिका साकारत आहे. सध्या सगळीकडेच वजनदारची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाविषयी सईने मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा खास तुमच्यासाठी...वजनदार या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?- कावेरी ही पुण्यात वाढलेली, शिकलेली आणि मोकळ्या वातावरणात लहानाची मोठी होते. मध्यमवर्गीय कुटुंबातली असूनही स्वतंत्र विचार करणाऱ्या कावेरीचे लग्न रुढीप्रिय कुटुंबात होते. तिच्या सासरी स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची परंपरा असते. तिचा नवराही रुढीप्रिय असतो. वजन कमी करण्यासाठी स्त्रियांनी जीममध्ये न जाता घरात कामवाली न ठेवता स्वत: घरातील काम करून वजन कमी करावे, अशा भुरसट विचारसरणीचा तो असतो. प्रियाचे आणि तुझे ट्युनिंग कसे जमले?- आमचे ट्युनिंग चांगले आहे. कारण आमचे नाते आॅफ स्क्रीन देखील चांगले आहे. प्रियाची एनर्जी खूप जास्त आहे. ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला तिचे कौतुक वाटते. आमचा प्रवास उलटा आहे. कारण आम्ही आधी चित्रपटासाठी भेटलो. शूटिंगदरम्यान आमची मैत्री घट्ट झाली आणि आजही आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. एखाद्या भूमिकेसाठी जेव्हा कलाकार मेकओव्हर करतात, त्या वेळी दुसरे चित्रपट स्वीकारताना अडचण येत नाही का?- एकाच वेळी चार-पाच चित्रपट सध्याच्या काळात तरी कोणी करीत नाही किंवा एकाच दिवशी दोन चित्रपटांचे शूटिंगदेखील नसते. पण, मी मध्यंतरी ‘वजनदार’ करीत असताना काही चित्रपटांसाठी मी शूट केले होते. एखादी गोष्ट करून दाखवायची, असे एकदा ठरवले तर कोणत्याच कलाकाराला अडचणींना सामोरे जावे लागत नाही, असे मला वाटते. मुलींना झटपट बारीक व्हायचे असते, त्याबद्दल तुझे मत काय आहे?- सध्या सगळ्यांनाच प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते. प्रत्येकालाच आजकाल बारीक व्हायची इच्छा असते. पण, ती काही सोपी गोष्ट नाही. ते तुमचे शरीर आहे त्यासोबत खेळ करून चालणार नाही, ही गोष्ट सर्वांनीच समजून घ्यायला हवी. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. काही जन्मत: जाड असतात, तर काही बारीक असतात. त्यामुळे जर तुमच्या शरीराला बारीक व्हायला वेळ लागणार असेल, तर तो तुम्ही त्याला द्यायलाच हवा.
सईच्या वजनदार टिप्स...
By admin | Updated: November 11, 2016 02:41 IST