ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूड दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आपल्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असतो. एकदा का त्याचा रागाचा पारा चढला की मग समोरच्या व्यक्तीचं काही खरं नसतं. विवेक ओबेरॉयला तर त्याने अजूनपर्यंत माफ केलेलं नाही. सलमानला न आवडणा-या लोकांची यादी तशी मोठीच आहे. त्याच्या याच रागाचा पारा चढला आणि त्याने बिग बॉसमधील स्पर्धक प्रियांका जग्गाला घराबाहेर काढलं आहे. इतकंच नाही तर प्रियांका जग्गा पुन्हा कर्लसच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसली तर आपण कलर्ससोबत काम करणार नाही अशी धमकीच दिली आहे.
याअगोदर प्रियांका जग्गा आजारी असल्याने बिग बॉसमधून बाहेर पडत असल्याचं सांगण्यात आलं होतं. शनिवारी पुढच्या भागातील काही सीन्स दाखवण्यात आले त्यामधून सलमान प्रियांका जग्गावर संतापल्याचं दिसत आहे. प्रियांकाने लोपमुद्रा राऊत आणि मनू पंजाबीच्या आजारी आईवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावरुन जेव्हा सलमानने प्रियांकाला झापलं तेव्हा प्रियांकाने सलमानशी वाद घालण्यास सुरुवात केली, जे सलमानला अजिबात रुचलं नाही. शेवटी सलमानने प्रियांकाला कार्यक्रम सोडून जाण्यास सांगितलं ज्यावर प्रियांकाने माफी मागितली.
प्रियांकाला सलमानने बाहेर काढल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी आभार मानले असून हे त्याने आधीच करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण तिच्या वागण्यामुले नाही तर वाद घातल्यामुळे सलमानने घराबाहेर काढल्याचं बोललं जात आहे. आता जेव्हा स्वत: प्रियांका काय झालं सांगेल, तेव्हा खरं सत्य कळेलं.