‘किक’ या आगामी चित्रपटामुळे सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटात तो श्रीलंकन सुंदरी ज्ॉकलीन फर्नाडिससोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. त्या प्रसंगी सलमानने ज्ॉकलीनची तुलना माजी ‘सेक्सबॉम्ब’ ङिानत अमानसोबत केली. ङिानतशी तुलना केल्याने ज्ॉकलीनवरील दबाव वाढला आहे. ‘ङिानतसोबत सलमानने केलेली तुलनाही आपली आतार्पयतची सर्वात मोठी स्तुती आहे; परंतु यामुळे मी दबावात आले आहे. पुन्हा असे वक्तव्य करू नको, अशी विनंती मी सलमानला केली आहे, ‘असे ज्ॉकलीनने सांगितले. ‘किक’मुळे सलमान आणि ज्ॉकलीन यांच्यात जवळीक वाढत असून, अनेक निर्मात्यांना सध्या सलमान हा ज्ॉकलीनचे नाव सुचवित आहे. ‘किक’च्या माध्यमातून निर्माता साजीद नाडियादवाला हा देखील प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रत उतरत आहे.
ज्ॉकलीनवर सलमान फिदा
By admin | Updated: June 20, 2014 23:20 IST