सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ सलमान त्याच्या काही खास मित्रांना प्रदर्शित होण्याअगोदर दाखवणार आहे; परंतु ज्या खास मित्रांना तो बोलावणार आहे त्यामध्ये चक्क ‘कॅटरिना’चे नाव नाही? या आठवड्यात सोमवापासून बॉलीवूडमधील सलमानच्या मित्रांनी दररोज बजरंगीचा शो पाहिला. कॅटरिनाला यात आमंत्रण नव्हते हे लक्षात आले. याचे मुख्य कारण म्हणजे कॅट आणि रणबीर यांच्यात वाढलेली जवळीक हे आहे. सलमानसोबतचे अफेअर संपले तरी कॅटरिनाने तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात सलमानला बोलावले आहे. त्याचबरोबर सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिचे नाव तर ‘बजरंगी’ पाहण्यासाठी असलेल्या आमंत्रितांमध्ये सर्वांत पुढे आहे.
सलमानने ‘कॅट’ला वगळले?
By admin | Updated: July 17, 2015 14:09 IST