Join us  

‘कवितेचं गाणं’मध्ये दिसणार सलील कुलकर्णी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 5:37 AM

म राठी चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील कुलकर्णी लवकरच आपल्याला ‘कवितेचं गाणं होताना’ या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत.

म राठी चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील कुलकर्णी लवकरच आपल्याला ‘कवितेचं गाणं होताना’ या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. संगीतावर, कवितांवर आणि सर्वांच्या जवळचा विषय असलेल्या गाण्यांवरील ही पहिलीच वेब सीरिज असणार आहे. कविता आणि गाणं या दोघांमधील प्रवास नक्की असतो तरी कसा हे यातून सांगण्यात आलंय. याविषीयी बोलताना सलील कुलकर्णी म्हणाला, एखादी कविता जेव्हा चालीमध्ये फुलत जाते, तो आनंद काही वेगळाच असतो. संगीतकाराची भूमिका एखाद्या टुरिस्ट गाईडसारखी असते. तो कवितेच्या गावातील सर्व सौंदर्यस्थळे तुम्हाला दाखवित असतो. तसं म्हटले तर कवितेला जर चाल लावायला गेलो तर पाच मिनिटांत पण चाल लावली जाऊ शकते. पण मग ती उगाचच मानगुटीवर बसवलेली चाल होते. सहज सुचलेली चाल त्या कवितेला जास्त पुढे घेऊन जाते. पुष्कळदा आपल्याला वाटते की आपल्या घराच्या खिडकीच्या तुकड्यातून जेवढे आकाश दिसते तेवढेच ते आहे. परंतु तसे नसते, आकाश के उस पार भी आकाश है... तसेच कवितांचे आहे, तशीच गाणी असतात कागदावरील अक्षरांच्या पलीकडे जेव्हा संगीतकाराला काही दिसतं तेव्हाच त्या कवितेच गाणं होतं. अशाप्रकाच्या भावना सलील कुलकर्णीने व्यक्त केल्या आहेत.