Join us

‘आराधना’चा रिमेक बनविणार सैफ

By admin | Updated: October 31, 2014 23:48 IST

सैफ अली खानला त्याची आई शर्मिला टागोर यांची भूमिका असलेला ‘आराधना’ हा चित्रपट खूप आवडतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या चित्रपटाच्या रिमेकची कल्पना त्याच्या मनात आहे.

सैफ अली खानला त्याची आई शर्मिला टागोर यांची भूमिका असलेला ‘आराधना’ हा चित्रपट खूप आवडतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या चित्रपटाच्या रिमेकची कल्पना त्याच्या मनात आहे. आता त्याने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून, निर्माता म्हणून हा चित्रपट बनविण्याचा विचार त्याने केला आहे. सूत्रंनुसार या चित्रपटात शर्मिला यांनी निभावलेल्या भूमिकेसाठी त्याने करिना कपूरची निवड केली आहे; पण राजेश खन्ना यांनी निभावलेल्या भूमिकेसाठी तो अभिनेत्याच्या शोधात आहे. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन शक्ती सामंत यांनी केले होते. एस.डी. बर्मन यांनी संगीत दिले होते. त्यांनी  संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत.