सा जीद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ मध्ये सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर हे तिघेही ट्रिपल रोलमध्ये दिसले. चित्रपट अपयशी ठरला आणि समीक्षकांनीही निशाणा साधला. आता सैफला या चित्रपटात काम करण्याबाबत लाजिरवाणो वाटत असल्याची बातमी आहे. त्याच्या भूमिकेबाबत मिळालेल्या प्रतिक्रियांनी तो नाखुश आहे. त्यामुळे तो या चित्रपटाची सक्सेस पार्टी सोडून अॅड शूटसाठी मलेशियाला रवाना झाला आहे. सक्सेस पार्टीत मीडियाकडून विचारण्यात येणा:या प्रश्नांपासून वाचण्यासाठी सैफने हा निर्णय घेतला आहे.