मुंबई : ‘सियाराम’चा आणखी एक ब्रॅण्ड असलेल्या ‘आॅक्झमबर्ग’च्या कॅम्पेनसाठी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान मैदानात उतरला आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील तरुणाईला ‘आॅक्झमबर्ग’ ब्रॅण्डकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने सैफला करारबद्ध केले आहे. कार्यालयीन पेहरावासह सर्वसाधारण आकर्षक पेहरावांतील कपड्यांचा या ब्रॅण्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.‘सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड’चे कार्यकारी संचालक गौरव पोदार यांनी याबाबत सांगितले की, ‘आॅक्झमबर्ग’ने बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले आहे. गुणवत्ता आणि नावीन्य या दोन घटकांमुळे या उत्पादनाने पकड निर्माण केली आहे. तरुणांना या ब्रॅण्डकडे आकर्षित करणे हा कॅम्पेनमागचा उद्देश आहे. त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे. सैफ अली खानने ‘आॅक्झमबर्ग’चे मनापासून कौतुक केले आहे. पेहरावांच्या आकर्षक रंगसंगतीमुळे तरुण या ब्रॅण्डकडे आकर्षित होत आहेत, असे त्याने नमूद केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
‘आॅक्झमबर्ग’च्या कॅम्पेनमध्ये सैफ
By admin | Updated: September 1, 2015 03:11 IST