Join us  

अफवांचे बळी!

By admin | Published: June 14, 2017 2:14 AM

सोशल मीडियामुळे आता जग जवळ आलंय. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिवटर, व्हॉट्स अ‍ॅप यांच्या वापरामुळे आपण बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत क नेक्ट राहतो.

- Aboli Kulkarniसोशल मीडियामुळे आता जग जवळ आलंय. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिवटर, व्हॉट्स अ‍ॅप यांच्या वापरामुळे आपण बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत क नेक्ट राहतो. त्यांचे दैनंदिन फोटो, लाईफ इव्हेंट्स, फोटोशूट हे आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण, याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मृत्यूच्या बातम्यांमुळे सेलिब्रिटींना अनेकदा मनस्तापही सहन करावा लागला आहे. मध्यंतरी शाहरूख खानचे विमान क्रॅश झाले, अशी एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे शाहरूखसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला. ‘बी टाऊन’मधील अनेक सेलिब्रिटींसोबत असे प्रकार घडले. पाहूयात, कोण आहेत हे सेलिब्रिटी...माधुरी दीक्षित‘बॉलिवूडची धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचे फॅन्स जगभरात आहेत. ‘माधुरी दीक्षितचे हृदयविकाराने निधन झाले’ या सोशल मीडियावरील बातमीने माधुरीसहित सर्वच फॅन्स काळजीत पडले. माधुरी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता हे कळताच फॅन्सच्या जीवात जीव आला. तसेच माधुरी दीक्षितलाही ट्विटरवरून ‘मी बरी आहे, मला काहीही झालेले नाही’ असे सांगावे लागले. लता मंगेशकर‘भारताची गानकोकिळा’ लता मंगेशकर यांच्या मृत्यूच्या अफवेनेही चाहते त्रस्त झाले असता त्यांनी सक ाळीच ट्विटरवर पोस्ट केले की, ‘नमस्कार. प्लीज माझ्या मृत्यूसंदर्भातील कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. देवाच्या कृपेने माझी तब्येत चांगली आहे.’ त्यानंतर लगेचच त्यांनी ट्विट केले की, ‘तुम्हाला जर तुमचा दिवस चांगला जावो असे वाटत असेल तर चांगला दिवस आणि वाईट दिवस हा केवळ एक समज आहे. लक्षात ठेवा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला जगण्याचं सामर्थ्य देत असतो.’ शक्ती कपूरशक्ती कपूर यांच्या एका दिवसाची सुरुवातच फोन आणि मेसेजेसनी सुरू झाली. ‘तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही कुठे आहात? अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर येऊन धडकत होते. शक्ती कपूर गोंधळले. या मेसेजेसचा शोध घेतला तेव्हा त्यांना कळालं की, ‘खंडाळाजवळील एका कार अपघातात अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे,’ अशी बातमी व्हायरल झाली होती. त्यावेळी शक्ती कपूर नुकतेच ‘क्या कूल हैं हम ३’ च्या बँकॉक शेड्यूल आटोपून मुंबईत आले होते. हे कळताच त्यांचे सर्व मित्र त्यांना फोन करू लागले, रडू लागले. पण, सगळं ‘ओके’ असल्याचे शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा सर्वांना समाधान वाटले. दिलीप कुमारज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या अफवा तर अनेकदा व्हायरल झाल्या. ‘बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला,’ असा मेसेज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होता. मात्र, त्यांनी ट्विटरवर त्यांच्या तब्येतीची खुशाली कळवल्यावर फॅन्सना धन्य वाटले.आयुषमान खुरानागायक, अभिनेता अशा पातळ्यांवर लीलया फिरणारा आयुषमान खुराना हा देखील या मृत्यूंच्या अफवांमधून सुटला नाही. अफवा अशी होती की, ‘आयुषमान त्याचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासोबत स्वित्झर्लंड येथे हॉलीडेज एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तिथे ‘स्रो बोर्डिंग’च्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. पण, जेव्हा हे त्याला कळाले तेव्हा त्याने ट्विटरवर पोस्ट केले की, ‘मी काही अफवा ऐकतो आहे. असं काहीच नाही. मी एकदम ठणठणीत आहे. या अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.’ फरिदा जलाल‘बॉलिवूडची प्रेमळ आई ’ फरिदा जलाल ही देखील अशाच मृत्यूच्या अफवांमुळे नाराज झाली होती. तिला अखेर तिच्या चांगल्या तब्येतीचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर द्यावे लागले. पण, या घटनेने ती फारच दु:खी झाली. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले की,‘ मला माहीत नाही की, या बातम्या कुठून येतात? पण, अशा अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका.’