Join us

लय भारी चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

By admin | Updated: July 6, 2014 01:40 IST

बहुचर्चित ‘लय भारी’ या अभिनेता रितेश देशमुख याच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मुंबई : बहुचर्चित ‘लय भारी’ या अभिनेता रितेश देशमुख याच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे 11 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद झाला असून, यावर दावा करीत टेकलिगल या कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. या नावाने 2क्1क्मध्ये संकेतस्थळ सुरू आहे. या नावाचे हक्क आपल्याकडेच आहेत. तेव्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली. न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासामरे यावर सुनावणी झाली. त्यात चित्रपटाची निर्माती व अभिनेता रितेशची पत्नी जेनिलिआ देशमुख यांनी यावर आक्षेप घेतला. मुळात या शीर्षकाने एका मराठी वाहिनीवर कार्यक्रम सुरू आहे. हॉटेल्स् आहेत. असे असताना केवळ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेणो अयोग्य असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)