Join us

पुन्हा प्रार्थना -वैभवची जोडी

By admin | Updated: September 4, 2015 23:24 IST

तुम्हाला ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपटातील साधा, शांत स्वभावाचा वैभव तत्त्ववादी आणि काहीशी काकूबाई, भावी जोडीदाराकडून काहीशा टिपीकल अपेक्षा असलेली

तुम्हाला ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपटातील साधा, शांत स्वभावाचा वैभव तत्त्ववादी आणि काहीशी काकूबाई, भावी जोडीदाराकडून काहीशा टिपीकल अपेक्षा असलेली प्रार्थना बेहरे आठवतच असतील ना? आठवायलाच पाहिजेत. पण आता तुम्हाला वैभव तत्त्ववादी एका रांगड्या, मारामारी करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ँड मिसेस सदाचारी’मध्ये एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाच्या रूपात पाहायला मिळणार असणार आहे. इतकंच नाही तर प्रार्थना आणि वैभव ही हिट ठरलेली जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.