अ भिनेत्री दिया मिर्झा म्हणते, धर्म ही कधीच तिची ओळख नाही. ‘मी जिद्दू कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान असलेल्या शाळेत गेले. ख्रिश्चन फादर आणि बंगाली आई, तसेच मुस्लीम कुटुंबात मी मोठी झाले. त्यामुळे धर्म ही कधीच माझी ओळख असू शकत नाही. मी काळाच्या ओघात वाढले, आयुष्य समृद्ध केले,’ असे पृथ्वी फेस्टिव्हलमध्ये तिने सांगितले. व्यक्तीची ओळख धर्म ही असू शकत नाही. सध्या पुरस्कार परत करण्याच्या प्रकारावर ती म्हणाली, ‘कोणताही पुरस्कार मिळवणे व परत करणे हे आपल्या हातात नाही. खरंतर हा एक सन्मान आहे. त्यामुळे तो कुणीही परत करू नये.
धर्म माझी ओळख नाही
By admin | Updated: November 9, 2015 02:30 IST