बॉलीवूडमध्ये एखाद्या चित्रपटाला कलाकाराने नकार दिला, तर त्याची जागा दुसरा कलाकार भरून काढतो. दिग्दर्शक ओनिरच्या आगामी चित्रपटात 9क् च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानीला कास्ट करण्यात आले होते; पण तिने चित्रपटाला नकार दिल्याने तिची जागा रविना टंडन घेणार आहे. या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय संगीताने घेतला होता; पण चित्रपटात काही बोल्ड दृश्ये असल्याने तिने हा चित्रपट नाकारला. ओनिरनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. रविना चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे त्याने म्हटले आहे. चित्रपटात संजय सुरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
संगीताच्या जागी रविना
By admin | Updated: June 27, 2014 23:11 IST