Join us  

रणबीर कपूरचा परफेक्ट संजय दत्त लूक

By admin | Published: February 21, 2017 3:00 PM

आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे. ‘मुन्नाभाई सिरीज’, ‘३ इडियटस्’, ‘पीके’ फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत केली असून संजय दत्तसारखं दिसण्यासाठी त्याचा संपुर्ण मेकओव्हर करण्यात आल्याची चर्चा होती. चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले असून ते पाहून रणबीर कपूर या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचं दिसत आहे.
 
(संजय दत्तच्या सिनेमात सोनम कपूर साकारणार धक-धक गर्ल माधुरी)
(जेव्हा संजय दत्त करणार होता ऋषी कपूरची पिटाई..!)
(जाणून घ्या माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या प्रेमकथेविषयी...)
 
चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले असून रणबीरला पाहून 1990 मधील संजय दत्तची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. रणबीर कपूर एकदम परफेक्ट लूकमध्ये दिसत आहे. मध्यंतरी संजय दत्त आणि रणबीरमध्ये काही अलबेल नसून संजय दत्त नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण या फोटोंवरुन तरी सध्या ही फक्त चर्चाच होती असं वाटत आहे.
1990 मध्ये दिसणा-या लांब केसांचा संजय दत्त, सोबत ट्राऊजर, शर्ट आणि वेस्टकोटची असलेली फॅशन रणबीरने एकदम तंतोतंत केली आहे. चित्रपट संजय दत्तवर आधारित असला तरी चित्रपटात वाद दाखवणे टाळण्यात आलं असून वडिल - मुलाच्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. चित्रपटात परेश रावल संजय दत्त यांची भूमिका निभावताना दिसतील. तर मनिषा कोईराला नर्गिस दत्त यांची भूमिका साकारणार आहे. 
मध्यंतरी संजय रणबीरला टाळत होता. एका पार्टीत दोघांचे भांडण झाल्याचेही वृत्त होते. रणबीरच्या निवडीमुळे संजय दत्त खुश नाही. रणबीरचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व त्याच्यासारखे नसल्यामुळे तो थोडासा चिंतीत आहे, अशी अफवा पसरली होती. या सगळ्या प्रकराणाला फुल स्टॉप लावण्यासाठी अखेर हिराणींना पुढे यावे लागले.
‘दंगल’च्या प्रीमिअरला आलेल्या हिराणींनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटले की, ‘रणबीर-संजयमध्ये वाद असल्याच्या बातम्या पूर्ण असत्य आहे. दोघांची खूप चांगली मैत्री असून संजय त्याला मदत करण्यासाठी खूप मदत करीत आहे. संजयचा स्वभावच मुळात मिश्किल आणि विनोदी आहे. रणबीरला टाळत असल्याची गोष्ट त्याच्या विनोदाचा एक भाग आहे. त्यामुळे या चर्चा थांबवा.’