Join us

शोलेचा रिमेक बनवल्याने राम गोपाल वर्मांना १० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2015 12:53 IST

शोले या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक बनवल्याबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - शोले या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक बनवल्याबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वर्मा यांनी कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप शोलेच्या निर्मात्यांनी केली होती. 
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाचा रामगोपाल वर्मा यांनी रिमेक केला होता. रामगोपाल वर्मा यांनी कॉपीऱाईट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत शोलेच्या निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी न्या. मनमोहन सिंग यांनी निकाल दिला. रामगोपाल वर्मा यांनी जाणूनबुजून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केले असे मत मांडन हायकोर्टाने रामगोपाल वर्मा यांच्या प्रॉडक्शन हाऊसला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मूळ चित्रपटातील गब्बर सारख्या पात्राचा उपयोग करण्यावरही बंदी घातली.