Join us

शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन माधुरी

By admin | Updated: June 17, 2014 08:08 IST

माधुरी दीक्षितच्या आजवरच्या करिअरमध्ये आजा नच ले हा एकच चित्रपट शास्त्रीय नृत्यावर आधारित होता; पण माधुरीच्या मते, तिने नेहमीच शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन दिले आहे.

माधुरी दीक्षितच्या आजवरच्या करिअरमध्ये आजा नच ले हा एकच चित्रपट शास्त्रीय नृत्यावर आधारित होता; पण माधुरीच्या मते, तिने नेहमीच शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन दिले आहे. माधुरीने डेढ इश्किया या चित्रपटात कथ्थक नृत्यांगनेची भूमिका निभावली होती. त्यात तिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या एका गाण्यात ती पारंपरिक नृत्य करताना दिसली. हे गाणे बिरजू महाराज यांनी कोरियोग्राफ केले होते. माधुरी म्हणाली की, ‘मी आजा नचलेशिवाय इतर कोणताही नृत्याधारित चित्रपट केलेला नाही; पण माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मी नृत्याला प्रोत्साहन दिले आहे.