मे री कॉम या लवकरच रिलीज होणा:या चित्रपटात प्रियंका चोप्राचा बाल्ड लूक पाहायला मिळणार आहे. महिला बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला रिअल टच देण्यासाठी प्रियंकाने शक्य ते सर्वच प्रयत्न केले आहेत. तिचे मसल्स चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाहायला मिळाले आहेत. आता चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये तिचे टक्कल पाहायला मिळेल. याबाबत विचारल्यावर प्रियंका म्हणाली की, ‘या भूमिकेला योग्य न्याय देणो ही माझी जबाबदारी आहे. बॉक्सर मेरी कॉमनेही तिचे टक्कल करून घेतले होते. चित्रपटातील हा रिअल सीन करताना आनंद झाल्याचे प्रियंकाने सांगितले.