रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी गोखल्यांची सूनच तेवढी राहिली होती. मात्र ही गोखल्यांची सून जान्हवी उर्फ तेजश्री प्रधान लवकरच नाटकात काम करणार आहे. तेजश्री शशांक केतकरबरोबर नाटक करत नसून प्रशांत दामलेंबरोबर ‘कार्टी काळजात घुसली’त काम करणार आहे. थोडक्यात काय तर तेजश्री नाटकात प्रशांतची कार्टी होणार आहे. प्रशांत दामलेंचे वर्षभराने केलेले पुनरागमन तेजश्रीमुळे किती यशस्वी होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रशांतची ‘कार्टी’
By admin | Updated: March 21, 2015 23:24 IST