Join us  

विनोदाच्या नावावर राजकारण

By admin | Published: February 04, 2016 1:45 AM

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ हा कार्यक्रम नुकताच बंद करण्यात आला आहे. ‘कलर्स चॅनल’पासून अलिप्त राहण्यासाठी किंवा टीआरपीसाठी हा शो बंद करण्यात आला

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ हा कार्यक्रम नुकताच बंद करण्यात आला आहे. ‘कलर्स चॅनल’पासून अलिप्त राहण्यासाठी किंवा टीआरपीसाठी हा शो बंद करण्यात आला नाही तर कलाकारांत व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी असलेल्या वादातून व इगोमुळे हा कार्यक्रम बंद झाला आहे. यात मनोरंजक गोष्ट अशी की, कपिल शर्मा अन्य एका वाहिनीवर कॉमेडी नाईटस् सारखा कार्यक्रम सुरू करणार आहेत. या नव्या कार्यक्रमाचा काँसेप्ट जवळपास ‘कॉमेटी नाईट’सारखाच असेल. कॉमेडी नाईटस् बंद होण्याचा मिमांसा केल्यावर असे लक्षात येते की, कपिलच्या शो मध्ये ‘गुत्थी’चे कॅरेक्टर साकारणारा सुनील ग्रोवरचे काही दिवसांपूर्वी कपिल शर्माशी मतभेद झाले होते. त्याने ‘स्टार प्लस’वर आपला ‘कॉमेडी शो’ सुरू केला होेता. मात्र, अपयशामुळे सुनीलचा कार्यक्रम बंद झाला. अन् सुनीलला कपिलच्या ‘कॉमेडी नाईटस्’मध्ये परत यावे लागले. सुनील ग्रोवरचा कार्यक्रम बंद होण्यामागे अ‍ेनक गोष्टी सांगितल्या जातात. यात हा कार्यक्रम ‘फ्लॉप’ ठरावा यासाठी अनेक प्रकारचे ‘खेळ’ रचण्यात आले. आता कपिल ज्यावेळी नव्या चॅनलवर आपला नवा कार्यक्रम सुरू करेल, त्यावेळी त्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ‘एसिड टेस्ट’ ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पद्धतीने सांगावयाचे झाले तर सुनीलचा ‘कॉमेडी शो’ जे यश मिळऊ शकला नाही. तेच काम कपिल आणि त्याच्या टीमला करून दाखवायचे आहे. भारतात टेलिव्हिजनचा व्यवसाय सत्तर हजार कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे ‘फिक्शन व नॉन फिक्शन शो वरू न वादविवादाची परिस्थिती कायम सुरू असते. तीन महिन्यापेक्षाही कमी वेळात ‘फिक्शन शो’ला बंद करण्यावरून दोन डझन शोचे दुकाने बंद झाले आहेत. दुसरीकडे नॉन फिक्शन शोची परिस्थितीदेखील फार चांगली नाही. कॉमेडीची गोष्ट केली तर, कपिलच्या कॉमेडी नाईटस्पूर्वी सुनील ग्रोव्हरचा कार्यक्रम आणि त्या अगोदर ‘कॉमेडी सर्र्कस’च्या निर्मात्याशी असलेल्या वादातून चॅनेलने अनेक कार्यक्रमांचा गळा घोटला आहे.

- anuj.alankar@lokmat.com