1 / 6अभिनेत्री यामी गौतम काल लग्नबंधनात अडकली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. 2 / 6यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. 3 / 6लग्नासाठी केवळ 18 पाहूणे उपस्थित होते. ज्यातील वर पक्षातील फक्त 5 लोक आले होते.4 / 6हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीने अलिशान घर खरेदी केलं आहे. याच ठिकाणी दोघांनी लग्न केले. 5 / 6आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.6 / 6यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो. मैत्रीपासून सुरू झालेल्या या प्रवासाला आज एक नवे वळण मिळाले.