Join us

VIDEO : विन डिझेल भारतात दाखल, मुंबईत मराठमोळे स्वागत

By admin | Updated: January 12, 2017 12:58 IST

'XXX: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हॉलिवूड स्टार विन डिझेल भारतात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पडूकोण हॉलिवूडमध्ये बस्तान बसवण्यास सज्ज झाली असून लवकरच तिचा 'XXX: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे तिचा हा पहिलावहिला हॉलिवूडपट सर्वप्रथम भारतात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्य प्रचारासाठी चक्क हॉलिवूड स्टार विन डिझेल भारतात दाखल झाला आहे. आज सकाळी दीपिका आणि चित्रपटाचा दिग्दर्शक डी.जे. कारूसो याच्यासह विन भारतात दाखल झाला. पारंपारिक भारतीय पद्धतीने, , नऊवारी नेसलेल्या युवतींनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. 
हॉलिवूड अभिनेता विन डिझेल आणि दीपिकाने ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रिकरणादरम्याने अनेकदा चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट दिली आहे. दीपिका पदुकोणच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्याची कबूली देखील विन डिजेल याने यापूर्वी दिली होती. गातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रपगृहात दाखल होणार आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतरत्र प्रदर्शित होईल.
या चित्रपटात दीपिकाने सेरेना उंगरची भूमिका साकारली असून तिच्यासह डोनी येन, निना डोबेरव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.