Join us  

जाणून घ्या ‘अग्गबाई सूनबाई’ मधील शुभ्रा म्हणजेच उमा पेंढारकरबद्दल या खास गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:34 PM

1 / 7
झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याऐवजी प्रेक्षकांना अग्गंबाई सूनबाई ही नवी मालिका पाहायला मिळत आहे.
2 / 7
अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसत आहे.
3 / 7
मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
4 / 7
डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं.
5 / 7
अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली.
6 / 7
प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं.
7 / 7
याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचं काम मोठया जबाबदारीनं करते.
टॅग्स :अग्गंबाई सूनबाई