Join us  

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Sonu Bhide : भिडे मास्तरांच्या संस्कारात वाढलेल्या सोनूने पार केल्या सर्व मर्यादा; 'तारक मेहता..' फेम Nidhi Bhanushali चे बिकिनी फोटो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 7:46 PM

1 / 9
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम निधी भानुशाली सोशल मीडियावर तिच्या जबरदस्त अशा फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड अँड बिनधास्त फोटो व व्हिडीओजने ती कायमच तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते.
2 / 9
निधी सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. कलेची आवड असल्याचे निधीने वेळोवेळी सांगितलं आहे. त्यामुळे गोव्यातील सुट्टी दरम्यान ती तेथील काही अँटिक आणि कलात्मक वस्तूंच्या शॉप मध्ये भेटी देत आहे.
3 / 9
गोव्यातील 'वेकेशन मोड' दरम्यान तिने तिचे काही हॉट फोटो पोस्ट केले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये आत्माराम तुकाराम भिडे (मंदार चांदवडकर) या पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्तिरेखेची मुलगी असलेली सोनू आता खूपच बदलल्याचं अनेक चाहत्यांनी लिहीलं आहे.
4 / 9
निधी कायमच आपले हॉट आणि बोल्ड फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत असते. सध्याही निधीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निधी मिरर सेल्फी काढताना स्पष्टपणे दिसत आहे.
5 / 9
निधीने याआधीदेखील काही बोल्ड व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले होते. त्यावेळीदेखील चाहत्यांच्या तिच्या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
6 / 9
निधीचा समुद्र किनाऱ्यावरचा बिकीनी लूकमधील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.तिच्या त्या फोटोंना चाहत्यांनी आणि फॉलोअर्सने मोठ्या प्रमाणावर लाईक्स दिले होते.
7 / 9
आताही निधीने मिरर सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने कॅप्शनदेखील लिहिलं आहे, 'इथे पाहण्यासारखं फारसं काहीही नाही. त्यामुळे सध्या फक्त काही मिरर सेल्फी आणि त्याबद्दल असलेलं नवं वेड'
8 / 9
या फोटोंमध्ये निधीने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा बिकिनी टॉप घातला आहे. त्या टॉपला कलात्मक पद्धतीने बॉटम्सही लावलेले दिसत आहेत. तसेच एका फोटोत विणकामाचे सूतही दिसून येत आहे. यात निधीचा नवा लूकही समोर आला असून ती बॉब कटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
9 / 9
याच शॉप मध्ये मिरर सेल्फीचा एक सेट उभारला असता तेथूनच निधीने बिकिनी टॉपमधील आपला मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. तिच्या या बोल्ड फोटोंना सध्या तुफान पसंती मिळत असून तीन दिवसा तिच्या फोटोंना सुमारे दीड लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. (सर्व फोटो - निधी भानुशाली इन्स्टाग्राम)
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामंदार चांदवडकर