Join us

लाईव्ह शो दरम्यान स्वामी ओमला लाथाबुक्क्यांचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 08:50 IST

शोच्या एंकरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वामी ओमला वारंवार शांत राहण्यासही सांगितलं. हे सगळं होत असताना अचानक धक्काबुक्कीला सुरूवात झाली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - टीव्ही रिअॅलिटी शो  ‘बिग बॉस 10’ मधून बाहेर काढण्यात आल्यानंतर स्वामी ओम आधीपेक्षा जास्त चर्चेत आहेत. 'जर मला ‘बिग बॉस’ च्या फिनालेमध्ये बोलावलं नाही तर मी फिनाले होऊ देणार नाही' असं ते मध्यंतरी म्हणाले होते.  
 
आता स्वामी ओम पुन्हा एकदा वादामध्ये आहेत. यावेळी एका न्यूज चॅनलच्या शो दरम्यान त्यांना मारहाण करण्यात आली.  ‘न्यूज़ नेशन’ या न्यूज चॅनलच्या शो दरम्यान स्वामी ओमचा एका महिलेसोबत वाद झाला. हा वाद इतका शीगेला पोहोचला की त्या महिलेने स्वामी ओम यांना मारण्याचा इशारा दिला त्यानंतर शोमध्ये मोठा कल्लोळ सुरू झाला. 
 
शोच्या एंकरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वामी ओमला वारंवार शांत राहण्यासही सांगितलं. हे सगळं होत असताना अचानक धक्काबुक्कीला सुरूवात झाली.  
 
स्वामी ओम हे देखील आपल्या जागेवरून उठले आणि शोमध्ये आलेल्या इतर पाहुण्यांना धक्काबुक्की करायला लागले. या दरम्यान स्वामी ओमच्या कानशिलात लगावण्यात आली, त्यावर स्वामी ओमनी मारामारीला सुरूवात केली.
 
यामध्ये स्वामी ओमचा तोल जाऊन ते खाली पडले यावेळी खाली पडलेल्या ओमला लाथा बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. 
 
त्यानंतर स्वामी ओम रागाच्या भरात स्टुडिओमधून निघून गेले. शोच्या एंकरकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला मात्र, ओम थांबले नाही.