महाराष्ट्राचा सुपरस्टार, मराठीचा चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक नवीन चित्रपटची केवळ चाहतेच नाही तर सर्व प्रेक्षकही आतूरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे आगामी ‘फ्रेंड्स’ चित्रपटाची के्रझ तमाम महाराष्ट्रात नसती तरच नवल! प्रदर्शनाची तारीख (१५ जानेवारी) जसजशी जवळ येत आहे तशी उत्सुकता आणखी वाढतच आहे. या निमित्त स्वप्नील जोशी, गौरी नलावडे आणि निर्माता संजय केलापुरे यांनी औरंगाबाद ‘लोकमत’ कार्यालयाला भेटी दिली. या दरम्यान चित्रपटाचा विषय, आशय, सेटवरची धमाल, दंगा मस्तीविषयी खुसखुशीत गप्पा रंगल्या. त्याचाच हा धावता आढावा...फ्रेंड्स : मैत्रीचा एक वेगळाच अँगलअलिकडच्या काळात मराठीत कॉलेजच्या फ्रेंडशिपविषयी अनेक चित्रपट आले. मात्र स्वप्नील म्हणतो, फ्रेंड्स यांपेक्षा एकदम वेगळा आह. मैत्री रसायनच असे आहे की, किती तरी वेगळ्या अँगलने तिच्याकडे पाहता येते. आमच्या चित्रपटातही असाच एक वेगळा अँगल आहे. प्रत्येक मैत्री युनिक असते. प्रत्येक दोन मित्रांचे इक्वेशन्स वेगळे असतात. या चित्रपटातून मैत्रीची नवीन कथा पाहायला मिळेल.संभाजी राजांची भूमिका साकारायला आवडेलमला जर कधी ऐतिहासिक भूमिका करायची असेल तर ती संभाजी राजांची असावी अशी माझी इच्छा आहे. मी रोलसाठी शोभून दिसेल की नाही ती वेगळी गोष्ट, पण मला ती साकारण्याचे स्वप्न आहे. हिंदी चित्रपट केले तरी मराठीत काम करणे कधीच थांबवणार नाही.- स्वप्निल जोशीआतून पुश मिळालास्वप्निल जोशीसोबत काम करण्याचा अनुभव एकदम अमेझिंग होता. आतापर्यंत मी टीव्ही सिरियल्स केल्या आहेत आणि मोठ्या पडद्यावर ‘फे्रंड्स’मधून येण्याची संधी मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आहे. आता १५ जानेवारीची वाट पाहतेय!!- गौरी नलावडे
मराठीशी नाळ तोडणार नाही
By admin | Updated: January 10, 2016 03:23 IST