Join us  

बीटाऊनमधील पाकिस्तानी कलाकार

By admin | Published: September 09, 2014 12:00 AM

९० च्या दशकातही पाकिस्तानमधील काही कलाकारांनी बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात धाव घेतली. झेबा बख्तियार यांनी रणधीर कपूर दिग्दर्शित हिना ...

९० च्या दशकातही पाकिस्तानमधील काही कलाकारांनी बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात धाव घेतली. झेबा बख्तियार यांनी रणधीर कपूर दिग्दर्शित हिना चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानी गायक अदनान सामीसोबत लग्न केले. मात्र १७ वर्षांपूर्वी दोघेही विभक्त झाले.

अभिनेत्री मीरानेही पाकिस्तानंतर भारतीय सिनेसृष्टीत नशीब आजमावून पाहिले. नझर कसक या चित्रपटांमधील बोल्ड दृष्यांमुळे मीरा चर्चेत होती. मात्र बॉलीवूडमध्ये तिला फारशी चमक दाखवता आली नाही. नुकतेच प्रियकरासोबतच्या एमएमएसमुळे मीरा पुन्हा प्रसिद्धीझोतात आली आहे.

बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये अश्मित पटेलसोबतच्या रासलीलांमुळे प्रसिद्ध झालेली वीणा मलिक बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून आली. दाल मे कूछ काला है या कॉमेडीपटातून तिने अभिनेत्री म्हणून काम केले. यानंतर झिंदगी ५० - ५० या चित्रपटातही वीणाच्या अभिनयाऐवजी बोल्ड सीन्सचीच चर्चा जास्त झाली.

सारा लॉरेन या पाकिस्तानी अभिनेत्रीनेही कजरारे मर्डर ३ या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. साराचा अभिनय प्रेक्षकांना फारसा भावला नसला तरी तिच्या बोल्ड अवताराची नेहमीच चर्चा असते.

पाकिस्तानी अभिनेता अली मोहम्मद जफरने तेरे बिन लादेन या कॉमेडी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. यानंतर यशराज बॅनरच्या लव्ह का द एंड मेरे ब्रदर की दुल्हन न्यूयॉर्क टोटल सियप्पा या चित्रपटांमधील अभिनयामुळे अलीने भारतात नाव कमावले. गायक गीतकार संगीतकार आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलीची महिला फॅन्सची संख्या चांगलीच वाढली आहे.

सोनम कपूरसोबत खुबसूरत या चित्रपटातून फवाद खान हा आणखी एक पाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमध्ये प्रवेश करत आहे. फवादने पाकिस्तानमध्ये अभिनयासह गायन संगीत क्षेत्रातही नाव कमावले आहे.

शिवसेनासारख्या राजकीय पक्षांचा प्रखर विरोध असतानाही बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणा-या पाकिस्तानी कलाकारांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा नटवरलाल या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत हुमैमाम मलिक या अभिनेत्रीने काम केले आहे. चित्रपट आणि हुमैमाम दोघेही फारशी छाप पाडू शकलेले नाहीत.