Join us

स्वप्निलची ‘मितवा’ बनण्याची पुन्हा संधी

By admin | Updated: August 7, 2015 23:22 IST

मराठी चित्रपटात हिरोईनची भूमिका आणि तीही मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशीसोबत. होय! हे शक्य होणार आहे. झकास हिरोईनसाठी टॅलेंट हंट होणार असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत

मराठी चित्रपटात हिरोईनची भूमिका आणि तीही मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशीसोबत. होय! हे शक्य होणार आहे. झकास हिरोईनसाठी टॅलेंट हंट होणार असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत ही निवड करणार आहेत. स्वप्निल जोशी मराठी चित्रपटसृष्टीत सतत काहीतरी नवीन करत असतो. स्वप्निलच्या ‘मितवा’मध्ये याच पध्दतीने टॅलेंट हंट करून प्रार्थना बेहरेची निवड झाली होती. त्यानंतर प्रार्थनाने अनेक चित्रपटांत गुणवत्ता सिद्ध केली. चित्रपटांत काम करण्याची अनेक मराठी मुलींची इच्छा नव्हे पॅशन असते. पण या रूपेरी दुनियेत कशा पद्धतीने प्रवेश करायचा हा प्रश्न असतो. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ हा फोरम यासारखे अनेक उपक्रम राबवितो. विविध स्पर्धांतून तरुणांना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते. त्याच पद्धतीने हा ‘टॅलेंट हंट’ होणार आहे. स्वप्निल म्हणाला, ‘‘मितवासाठी नायिकेचा शोध सुरू झाला, तो दिवस अगदी कालच असल्यासारखा वाटतो. आज प्रार्थना बेहेरेने प्रचंड यश मिळवले आहे आणि तिला लोकप्रिय नायिका म्हणून ओळखले जाते. या सीझनमधून अजून एका गुणी नायिकेचा शोध घेण्यात येईल, याबद्दल मला विश्वास वाटतो.'' ‘झकास हिरॉईन-सीझन २’ च्या निर्मितीबद्दल सांगताना जीसीम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशानदार म्हणाले, ‘या शोच्या माध्यमातून अनेक मुलींना आपले कलागुण दाखवायची आणि आपल्या करिअरची धडाक्यात सुरूवात करण्याची संधी मिळणार आहे. जीसीम्ससोबत स्वप्निल जोशी सहनिर्मात्याच्या भूमिकेत असण्याची देखील ही पहिलीच वेळ आह अभिनेत्री होऊ इच्छिणाऱ्या मुलींनी ६६६. ्नँं‘ंं२ँी१ङ्म्रल्ली.ूङ्मे लॉग आॅन करावे आणि आपले फोटो व अभिनयाची झलक दखवणारे व्हिडीयो अपलोड करून नावनोंदणी करावी.