सई ताम्हणकरने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले असून, एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तिच्या फॅन्सची संख्या करोडोमध्ये असून तिचे फॅन्स नेहमीच तिला भेटण्याची, तिच्यासोबत गप्पा मारण्याची इच्छा व्यक्त करत असतात. सईदेखील सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहात असते. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. सगळ्याच सोशल नेटवर्किंग साइटवर तिला अनेक फॉलोव्हर्स आहेत. सई तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती या सोशल नेटवर्किंगवरून नेहमीच देत असते. तसेच, चित्रीकरणादरम्यानच्या गप्पागोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असते. तसेच, ती कुठे फिरायला गेली तर तिथले फोटो आवर्जून सोशल नेटवर्किंगवर टाकते. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर तर तिचे स्वत:चे अकाऊंट असण्यासोबतच तिचे एक पेजदेखील आहे. तिच्या अकाऊंटवर अनेक फ्रेंड्स असण्यासोबतच 76 हजारहून अधिक लोक तिथे फॉलो करत आहेत. तसेच, तिच्या फेसबुक पेजवरही अनेक फॉलोव्हर्स आहेत. तिचे फेसबुक पेज आणि अकाऊंट हे दोन्ही फेसबुककडून व्हेरिफाइडदेखील करण्यात आले आहेत. आता फेसबुक पेजवर तिला एक दशलक्षहून अधिक लोक फॉलो करत आहेत. तिच्या फेसबुक फॉलोव्हर्सची संख्या एक दशलक्षहून अधिक झाल्याबद्दल तिने तिच्या फॅन्सचे आभार मानले आहेत. एक दशलक्षाहून अधिक लोकांचे मला प्रेम मिळाले असून, यापेक्षाही अधिक लोकांचे भविष्यात प्रेम मिळणार आहे, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सईचे फेसबुकवर एक दशलक्ष फॉलोव्हर्स
By admin | Updated: April 3, 2017 03:16 IST