Join us  

OMG! खुद्द रजनीकांतचे ट्विटर अकाऊंटच झाले हॅक...

By admin | Published: August 03, 2016 2:22 PM

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतना यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ३ - दक्षिणेचा सुपरस्टार, रसिक प्रेक्षक ज्याला देव मानून पूजा करतात, त्याला दुग्धाभिषेक घालतात, ज्याचा चित्रपट प्रदर्शित होते तेव्हा आपोआपच सुट्टी मिळते.... ही सर्व विशेषण लागू होणारी एकच व्यक्ती ती म्हणजे सुपरस्टार 'रजनीकांत'... रजनीकांतला जगात काहीच अशक्य नाही असे सांगत त्याच्यावरून अनेक जोक्स व्हायरल होतात. मात्र त्याच रजनीकांतना हॅकिंगचा फटका बसला आहे. रजनीकांत यांचे ट्विटर अकाऊंट नुकतेच हॅक झाले होते. काही अज्ञात व्यक्तींनी त्याचे अकाऊंट हॅक करून " रजनीकांत #HitToKill " असे ट्विट केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. 
दरम्यान थोड्या वेळानंतर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच रजनीकांत यांचे खरे अकाऊंट थोड्याच वेळात पूर्ववत होईल असेही तिने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. 
 
 
हे अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरून कमल हसन, आमिर खान, शाहरूख खान, कबालीचे दिग्दर्शक , निर्माते यांना फॉलो करण्यात आले होते. मात्र काहही वेळाने त्याचे अकाऊंट पूर्ववच झाल्यानंतर त्या सर्वांना पुन्हा अन-फॉलो करण्यात आले. 
रजनीकांत यांनी २०१३ सालीच ट्विटर जॉईन केले होते. त्यांचे ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.