Join us  

आता, मराठीतही पेज फोर

By admin | Published: April 23, 2016 1:17 AM

आश्चर्य वाटून नका घेऊ कारण मराठीत जरी पेज फोर येत असला तरी त्याचा बॉलिवूडच्या पेज थ्रीशी काही संबंध नसल्याचे अभिनेता निखिल राऊतने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सांगितले

आश्चर्य वाटून नका घेऊ कारण मराठीत जरी पेज फोर येत असला तरी त्याचा बॉलिवूडच्या पेज थ्रीशी काही संबंध नसल्याचे अभिनेता निखिल राऊतने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सांगितले. निखिल म्हणाला, ही चार मित्रांची कहाणी आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर हा चित्रपट आहे. समाजात घडणारे कृत्य व त्याचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम हा पेज फोर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. जयदीप येवले, परितोष प्रधान, क्षितीज कुलकर्णी दिग्दर्शित पेज फोर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तसेच या चित्रपटात निखिल राऊत, सौरभ गोखले, ओंकार गोवर्धन, गिरीश परदेशी हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. याव्यतिरिक्त मधुरा वेलणकर, विभावरी देशपांडे, गौतमी देशपांडे, केतकी नारायण, दीप्ती यांचा या चित्रपटात समावेश आहे.