Join us

सुप्रिया नव्हे, इंदिरा!

By admin | Updated: June 3, 2015 23:21 IST

अलीकडेच येऊन गेलेल्या ‘यशवंतराव चव्हाण’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा रंगवणारी सुप्रिया विनोद पुन्हा एकदा इंदिराजींच्या भूमिकेत रंगली

अलीकडेच येऊन गेलेल्या ‘यशवंतराव चव्हाण’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा रंगवणारी सुप्रिया विनोद पुन्हा एकदा इंदिराजींच्या भूमिकेत रंगली आहे. चित्रपटातून सरळ नाटकात ती ही भूमिका साकारणार आहे. ‘इंदिरा’ या नाटकात ती इंदिरा गांधी साकारत आहे. वडील रत्नाकर मतकरी यांनीच हे नाटक लिहिले असून, यातील भूमिकेला सुप्रिया उत्तम न्याय देईल हे वेगळे सांगायला नको.