Join us

सल्लूमियाँचे नवे डील!

By admin | Updated: May 27, 2016 02:20 IST

सुपरस्टार सलमान खान हा सध्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे करिअर, अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्स यांच्यामुळे सल्लूमियाँ

सुपरस्टार सलमान खान हा सध्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे करिअर, अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्स यांच्यामुळे सल्लूमियाँ संपूर्ण बॉलीवूडचा भाई आहे. ‘बिग बॉस ९’मध्ये आल्यापासून चाहत्यांसोबत त्याचा थेट संपर्क येऊ लागला. आता पुन्हा एकदा त्याने चाहत्यांना भेटायला येण्यासाठी तरतूद केली आहे. त्याने म्हणे आता ‘बिग बॉस १०’ची डीलही साईन केली आहे. पुन्हा बिग बॉसचे होस्टिंग करायला आता तो तयार झाला आहे. त्याला प्रत्येक एपिसोडला खूप मोठी रक्कम होस्टिंग करण्यासाठी मिळत असते. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘सुलतान’च्या रीलीज होण्याची वाट पाहतो आहे.