Join us  

नरेंद्र मोदी आणि क्विन एलिझाबेथ एकत्र पाहणार 'हा' सिनेमा?

By admin | Published: March 02, 2017 5:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयबकिंगम पॅलेसमध्ये पाहणार...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - या वर्षीचा मोस्ट अवेटेड सिनेमा  'बाहुबली: द कन्क्लूजन 2' ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिडीया रिपोर्टनुसार सर्वात आधी भारतीय दर्शकांना हा सिनेमा पाहता येणार नाही.  ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना सर्वात आधी हा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचं वृत्त आहे. 
 
बाहुबली-2 चा पहिला प्रिमियर लंडनमध्ये होणार असून राणी एलिझाबेथची त्यावेळी  प्रमुख उपस्थिती असणार असल्याची चर्चा आहे.  मिडीया रिपोर्टनुसार 27 एप्रिलला बकिंगम पॅलेसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष झाल्याच्या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान 'बाहुबली: द कन्क्लूजन 2' चा प्रिमियर दाखवणार असल्याचं वृत्त आहे. याशिवाय या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. 
 
एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाने भारतीय सिनेजगतात कमाईचा नवा इतिहास रचला होता. दोन वर्षांपासून सिनेमाच्या दुस-या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, बाहुबलीचा दुसरा भाग भारतीय सिनेजगतात आणखी नवा इतिहास रचणार असंच वाटतंय. कारणंही तसंच आहे, या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच 500 कोटी रूपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे.
सॅटेलाइट्स राइट्सच्या माध्यमातून बाहुबली-2 ने 500 कोटी रूपये कमावले आहेत.  बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करणार असून यासाठी करणच्या धर्मा प्रोडक्शनने याचे अधिकार 120 कोटींना विकत घेतले आहेत. 28 एप्रिलला हा सिनेमा 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  
 
प्रभाष, राणा डग्‍गुबती स्टारर 'बाहुबली-2' बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न 'कटप्‍पा ने बाहुबली को क्‍यों मारा?' याचं उत्तरही मिळणार आहे.