रंगभूमीवर अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवल्यानंतर नंदिता धुरीने ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये आईची भूमिका अफलातून साकारली. हीच नंदिता आता एका पाशबंधात अडकली आहे. खडतर जीवन जगणाऱ्या सामान्य स्त्रीची भूमिका तिने ‘पाशबंध’ या चित्रपटात रंगवली आहे. कायम हटके काम करणाऱ्या नंदिताच्या अभिनयाचे पाश रसिकांभोवती किती आवळले जातात याचीच आता उत्सुकता आहे.
पाशबंधात अडकली नंदिता...
By admin | Updated: March 25, 2015 23:46 IST