आपल्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांना भुरळ घालणाऱ्या कंगना राणावतने तिच्या आयुष्याशी निगडित अनेक आठवणींना उजाळा दिला आहे़ कंगनाचा पहिला चित्रपट ‘गँगस्टर’ने अनेक अवॉर्ड जिंकले होते़ कंगनाने सांगितले की, अनुराग बासूने तिला कुठल्या कॉफी शॉपमध्ये पाहिले नव्हते, त्या सर्व अफवा होत्या़ या चित्रपटात येण्याचा तिचा अनुभव तिने अनुपम खेरच्या टीव्ही शोमध्ये सांगितला़ हिमाचल प्रदेशच्या कंगनाने ‘द अनुपम खेर शो-कुछ भी हो सकता है’ मध्ये सांगितले, की ‘गँगस्टर’साठी तिचे आॅडिशन झाले होते़
कंगनाच्या मनातील रहस्य उलगडले
By admin | Updated: July 28, 2014 03:21 IST