मॉडेल टर्न अभिनेत्री मृण्मयी कोलवलकर लवकरच मराठीत धमाकेदार एन्ट्रीच्या तयारीत असून आगामी ‘मिस मॅच’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी अनेक उत्पादनांच्या जाहिरातीत मृण्मयीने काम केले आहे. त्यापैकी, दिनेश आणि लॉ रियलच्या उत्पादनातील तिचा हसरा व मोहक चेहरा आपल्या लक्षात आहे. प्रेम आणि विवाह या भोवती फिरणा:या या चित्रपटात एका श्रीमंत बापाची अरेंज मॅरेजवर विश्वास नसलेल्या मुलीची भूमिका तिला साकारायची आहे. यावरून आई-वडिलांशी संषर्घ आणि स्वत:साठी मि. परफेक्ट शोधासाठीचा तिचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. यात तिच्यासोबत उदय टीकेकर व भाऊ कदम यांच्याही भूमिका आहेत. पुढील महिन्याचया अखेरीर्पयत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मृण्मयीचा लवकरच ‘जरा सी लाईफ’ नावाचा हिंदी चित्रपटही येत आहे.