Join us

माङो आयुष्य रिअॅलिटी शो बनले आहे

By admin | Updated: June 26, 2014 22:39 IST

सध्या वर्तमानपत्रंमध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे रणबीर कपूर खूपच नाराज आहे. त्याची ही नाराजी त्याने एका कार्यक्रमात व्यक्त केली.

सध्या वर्तमानपत्रंमध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे रणबीर कपूर खूपच नाराज आहे. त्याची ही नाराजी त्याने एका कार्यक्रमात व्यक्त केली. अभिनयाऐवजी रणबीर कपूरची चर्चा त्याचे अफेअर्स आणि आई-वडिलांबाबत जास्त होत असते. रणबीरच्या माता-पित्यांना कॅटरिना आवडत नाही, त्यामुळे त्यांचे घर सोडून रणबीर कॅटसोबत दुसरीकडे राहायला जाणार आहे किंवा त्याने नवे घर घेतले असल्याचेही म्हटले जाते. रणबीर या बातम्यांनी दु:खी आहे. स्वत:ला झालेल्या दु:खाबाबत रणबीर फारसा विचार करीत नाही; पण त्याच्या आई-वडिलांना या बातम्या वाचून जे दु:ख झाले त्याबाबत वाईट वाटत असल्याचे तो म्हणाला.