Join us

प्रणोतीमुळे मोहरला नीलेश

By admin | Updated: February 6, 2015 23:51 IST

मराठी मालिका आणि चित्रपटातील गाण्यांमुळे सध्या नीलेश मोहरीर अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नीलेशच्या गाण्यांमुळे अनेकांचे प्रेम फुलले.

मराठी मालिका आणि चित्रपटातील गाण्यांमुळे सध्या नीलेश मोहरीर अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नीलेशच्या गाण्यांमुळे अनेकांचे प्रेम फुलले. मात्र नीलेशला मोहात पाडले आहे ते प्रणोती पाटणकरने. या जोडीचा साखरपुडा नुकताच झाला असून, लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. या काळात मात्र प्रणोतीला स्वप्नरंजनासाठी नीलेशच्या गाण्यांचाच आधार घ्यावा लागणार आहे.