Join us  

सोनाली खरेचा नवरा आहे हा प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबत केले आहे या चित्रपटात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 1:48 PM

सोनालीचा पती हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने काजोलसोबत एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

ठळक मुद्देअभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती.

सोनाली खरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या पतीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. तिचा पती हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने काजोलसोबत एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने बिजयने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर काही कालावधीनंतर त्याने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आणि काही काळ केवळ मालिकांमध्ये काम केले.

१९९८ साली औरत मालिकेत बिजय दिसला होता. त्यानंतर २००२ साली रामायणमध्ये त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता. अचानक पुन्हा एकदा त्याने मालिकेतून कमबॅक केले. दिल ही तो है या मालिकेत मुख्य भूमिका साकारून त्याने पुनरागमन केले होते. त्यानंतर सिया के राम मालिकेत त्याने राजा जनकची भूमिका साकारली होती. अभिनयातून ब्रेक घेतल्यावर त्याने योगाभ्यासचे ट्रेनिंग घेतले आणि स्वतःचे योगा सेंटर सुरू केले. अभिनयातून वेळ काढत तो योगा शिबिरही घेतो. 

 

टॅग्स :सोनाली खरे