Join us  

सिद्धार्थ जाधव म्हणाला,13 वर्षे तेरा साथ...! लग्नाचा वाढदिवस, मातृदिन एकसाथ...!!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:42 PM

आजचा दिवस सिद्धार्थने धडाक्यात साजरा केला. आई आणि बायको दोघींनाही गोड शुभेच्छा दिल्यात.

ठळक मुद्दे आईलाही त्याने मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्यात.

सिध्दार्थ जाधव हा अतिशय उत्कृष्ट कॉमेडियन आहे. विनोदाची जाण असलेला तसेच त्याच्या स्टँडअप कॉमेडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज सिद्धार्थसाठी खास दिवस. म्हणजे काय तर लग्नाचा वाढदिवस आणि मातृदिन दोन्ही एकसाथ. त्यामुळे आजचा दिवस सिद्धार्थने धडाक्यात साजरा केला. आई आणि बायको दोघींनाही गोड शुभेच्छा दिल्यात.सिद्धार्थच्या लग्नाला आज तेरा वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्ताने बायको तृप्तीसाठी त्याने खास पोस्ट लिहिली.

१३ वर्ष... तेरा साथ... तू किती  महत्त्वाची आहेस माझ्या आयुष्यात.. हे नव्याने सांगायची गरज नाही... आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण.....लव्ह यू  .. लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.. बायको, असे त्याने लिहिले. सोबत बायकोसोबतचा एक झक्कास फोटोही शेअर केला.

शिवाय आईलाही त्याने मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्यात. आईसोबतच्या फोटोंचा कोलाज सोबत, तिला आवडणारे एक सुंदर गाणे त्याने शेअर केले.

बायको तृप्तीबद्दल सिद्धार्थ नेहमीच भरभरून बोलतो. एका मुलाखतीत त्याने तिच्या बद्दल सांगितले होते. ‘तृप्ती ही माझी सर्वात चांगली मैत्रिण आहे, माझी सहकारी आहे आणि ती माझे खरे प्रेम आहे. ज्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली त्यानंतरच मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. त्यामुळे ती माझी लकी चार्म आहे. ती फक्त माझ्या कुटुंबाचीच काळजी घेते असे नाही. तर मी जेव्हा संघर्ष करत होतो तेव्हा अनेक जणांची जबाबदारी तिच्या खांद्यावर तिने घेतली होती. आम्ही पहिले नवीन घर आणि पहिली गाडी तिच्या मुळेच घेऊ शकलो, त्याबद्दल तिचे मी आभार मानतो. ती माझ्या जीवनात आली यात मला नशीबवान समजतो. इतकेच नाहीतर मला संपूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी तिला सलाम करतो. आज मी जो काही आहे, तो फक्त माझ्या बायको तृप्तीमुळेच, असे तो म्हणाला होता.