Join us  

प्रशांत दामले यांनी त्यांच्या फॅन्ससाठी कमी केले तिकिटाचे दर, वाचा त्यांची ही भन्नाट कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:53 PM

नाटकाचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने अनेकांना ते परवडत नाही. त्यामुळे प्रशांत दामले यांनी त्यांच्या फॅन्ससाठी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. 

ठळक मुद्देतू म्हणशील तसं आणि एका लग्नाची गोष्ट या नाटकाचे प्रयोग आज आणि रविवारी गडकरी रंगायतन येथे होणार आहेत. तेथील प्रयोगासाठी हे खास दर असणार आहेत आणि या तिकिटाची विक्री बुक माय शो वर नव्हे तर तिकिट खिडकीवर केली जाणार आहे.  

आपल्या संपूर्ण कुटुंबाला नाटकाला घेऊन जावे असे अनेकांना वाटते, पण नाटकाचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने अनेकांना ते परवडत नाही. त्यामुळे प्रशांत दामले यांनी त्यांच्या फॅन्ससाठी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. 

प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले आहे की, अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे. परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी रु 300 आणि रु 200 होता... तो आता मी रु 100 ठेवीन.   

'प्रायोगिक तत्वावर फक्त गडकरी रंगायतन मधे" अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक...

Posted by Prashant Damle on Wednesday, March 24, 2021

तू म्हणशील तसं आणि एका लग्नाची गोष्ट या नाटकाचे प्रयोग आज आणि रविवारी गडकरी रंगायतन येथे होणार आहेत. तेथील प्रयोगासाठी हे खास दर असणार आहेत आणि या तिकिटाची विक्री बुक माय शो वर नव्हे तर तिकिट खिडकीवर केली जाणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळूहळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन.

तू म्हणशील तसं चा १०० वा प्रयोग कधी आला कळलंच नाही. ९८ वा प्रयोग होणारे ठाण्यात! https://bit.ly/394HUXV या लिंक वर क्लिक करा आणि आपलं तिकीट बुक करा.

Posted by Prashant Damle on Wednesday, March 24, 2021

प्रशांत दामले यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आतापर्यंत 1300 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. प्रशांत दामले यांची ही कल्पना आम्हाला अतिशय आवडली असे त्यांचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

टॅग्स :प्रशांत दामले