मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र या चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईकचा खास मुजरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील 'हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है.. हे गाणे गायिका श्रीपर्णा चटर्जी हिने गायलेले आहे. या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईक खास तिच्या अदामध्ये मुजरा करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे निमार्ते शंतनु देशपांडे असून संगीतकार आणि गीतकार म्हणून चंद्रमोहन यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. तर मानसीसोबत अभिनेता राहुल सोलापूरकरचा अभिनयदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या मुजराविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मानसी म्हणाली, या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक बॉबी सय्यद आणि कॅमेरामॅन यांनी खूप मेहनत घेतली आहे. माझे 'मुजरा नृत्य' म्हणजे मुजऱ्याच्या रूपात लावणी असून मराठी चित्रपटात हा प्रकार प्रथमच पाहायला मिळणार आहे. तसेच या गाण्यात 'मराठमोळी मस्तानी' दाखविण्याचा एक नवीन प्रयोग केला असून ही मस्तानी तुमच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे असेच मी म्हणेन. तसेच या चित्रपटाची सर्वच टीम यंग आहे. तरुण दिग्दर्शक, अभिनेते यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. या चित्रपटाचे संगीत तरुणाईला आवडायला पाहिजे असा विचार करुनच आम्ही चित्रपटाला एकदम एनर्जेटिक संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. यातील एक मुजरा असणार आहे. मानसीने या मुजऱ्यामध्ये एकदमच कमाल केली आहे. हा मुजरादेखील वेगळ्या धाटणीचा असणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त हिंदी शब्द टाकण्यात आले असल्याचे संगीतकार चंद्रमोहन यांनी सांगितले.
मराठमोळी मस्तानी मानसी नाईकचा मुजरा
By admin | Updated: January 11, 2017 05:39 IST