हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात एका समलिंगी प्राध्यापकाची भूमिका साकारणार असल्याचे मनोज वाजपेयी याने सांगितले आहे. तो या चित्रपटात 6क् वर्षाच्या प्रोफेसरच्या भूमिकेत असून येत्या जानेवारी महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार अमाहे. हंसल मेहता यांचा हा चित्रपट वकील आणि सामाजिक कार्यकर्ते शाहिद आजमी यांच्यावर आधारित आहे. मनोजची भूमिका अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून सस्पेंड झालेल्या एका प्राध्यापकाच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित आहे. हा प्राधापक निवृत्त होण्यापूर्वीच त्याच्या दुष्कृत्याचे चित्रण एका स्पाय कॅमे:यात करण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू झाली असून पुढील वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
मनोज बनणार समलिंगी प्रोफेसर
By admin | Updated: December 6, 2014 23:57 IST