Join us  

ऐश्वर्यासोबत दिसणार मनोज वाजपेयी

By admin | Published: November 28, 2014 11:24 PM

ऑ फबीट चित्रपटांमध्ये काम करायला मनोज वाजपेयीला आवडते; पण व्यावसायिक चित्रपटांमध्येही तो तेवढाच सक्रिय आहे. लवकरच त्याचा ‘तेवर’ हा चित्रपटही रिलीज होतोय,

ऑ फबीट चित्रपटांमध्ये काम करायला मनोज वाजपेयीला आवडते; पण व्यावसायिक चित्रपटांमध्येही तो तेवढाच सक्रिय आहे. लवकरच त्याचा ‘तेवर’ हा चित्रपटही रिलीज होतोय, या चित्रपटात अजरुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचीही भूमिका आहे. मनोज आता ऐश्वर्या रायसोबतही स्क्रीन शेअर करणार आहे. संजय गुप्तांच्या ‘जज्बा’ या चित्रपटात त्याचीही महत्त्वाची भूमिका असेल. मनोज चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत असून त्याची ही महत्त्वाची भूमिका आहे. त्याचे चित्रपटातील इतर कलाकारांसोबतही अनेक सीन असणार आहेत. संजय गुप्तांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे; पण अद्याप काही औपचारिक कामे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जज्बा’मध्ये ऐश्वर्या वकिलाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.