Join us  

मनीषा लाम्बा बनली पोकर प्लेअर!

By admin | Published: July 02, 2017 5:09 AM

मनीषा लाम्बा बऱ्याच काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २००५ मध्ये ‘यहाँ’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या

मनीषा लाम्बा बऱ्याच काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २००५ मध्ये ‘यहाँ’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या मनीषाने ‘कॉर्पोरेट’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियाँ’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. परंतु, बॅक टू बॅक हिट चित्रपट देणे अशक्य होऊ लागल्याने तिच्या करिअरचा ग्राफ फ्लॉप ठरू लागला. त्यामुळे तिने हे क्षेत्र सोडून ‘जुगार’ क्षेत्राला आधार बनविले. आज ती भारताची पहिली प्रोफेशनल पोकर प्लेयर सेलिब्रिटी बनली आहे. मनीषाने फ्लॉप ठरू लागलेल्या फिल्मी करिअरमुळे लॉस वेगास येथे पोकर खेळण्यास (एक प्रकारचा जुगार) सुरुवात केली. सात वर्ष पोकर खेळल्यानंतर ती सध्या प्रोफेशनल पोकर प्लेयर बनली आहे. त्याचबरोबर पहिली सेलिब्रिटी पोकर प्लेयर म्हणूनही तिच्याकडे बघितले जात आहे. तिने आतापर्यंत लास वेगासमध्ये डब्ल्यूपीटी ५०० एरिया पोकर टुर्नामेंट, इंडियन पोकर चॅम्पियनशिप, हेल्टिन पोकर आणि गोव्यात झालेल्या कित्येक पोकर टुर्नामेंट्समध्ये सहभाग नोंदविला आहे.